विज्ञानाची आदिशक्ती
नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्री, दोन वेगवेगळ्या विषयात नोबेल मिळवणारी एकमेव स्त्री, दोन नोबेल मिळवणारी पहिलीच व्यक्ती, जिच्या कुटुंबात एक दोन नव्हे तब्बल पाच नोबेल पुरस्कार मिळाले अशी.
मॅडम मेरी क्युरी
तत्कालीन रशियाच्या पोलंडमध्ये १८६७ जन्माला आलेल्या मेरीने १८९५ मध्ये पेरी क्युरिशी विवाह केला आणि फ्रान्समध्ये स्थायिक झाली आणि इथूनच तिच्या वैज्ञानिक संशोधनाला प्रारंभ झाला.
हेन्री बेक्वेरल नावाचे एक संशोधक आधीपासून किरणोत्सर्गावर काम करत होते, क्युरी दांपत्याने त्यावरच पुढे काम करून किरणोत्सर्गावर मूलभूत संशोधन समोर आणले. किरणोत्सर्गासाठ ी वापरला जाणारा (Radio activity) हा शब्द पण त्यांचीच देणगी. याच कामासाठी त्यांना १९०३ मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले.
(प्रो. बेक्वेरल, मेरी क्युरी आणि पेरी क्युरी)
(प्रो. बेक्वेरल, मेरी क्युरी आणि पेरी क्युरी)
पोलोनियम आणि रेडियम ह्या दोन मूलद्रव्यांची शुद्धीकरण पद्धत, गुणधर्म शोधले, त्यांना नावे पण दिली, (पैकी पोलोनियम हे नाव त्यांनी आपला मूळ देश पोलंडवरून ठेवले). १९११ सालचे रसायन शास्त्राचे नोबेल मॅडम मेरी क्युरिना याचसाठी मिळाले होते.
पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान रेडियमचा वापर करून युद्धभूमीवर वापरण्यासाठी फिरत्या एक्स रे मशीनची देखील कल्पना त्यांनी साकारली होती.
पहिल्यांदाच संशोधन होत असल्याने मॅडम क्युरिंच्या काळात किराणोत्साराचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम माहीतच नव्हते, त्यामुळे किरणोत्सर्गापासुन वाचवणारे कपडे, मोजे वगैरे न वापरताच काम करण्यात येई. किरणोत्सारी द्रव्याबरोबर आयुष्यभर काम केल्यानेच त्यांना अप्लास्टिक ऍनिमिया नावाचा दुर्मिळ आजार झाला आणि वयाच्या 66 व्या वर्षी या विज्ञानाच्या खऱ्याखुऱ्या आदिशक्तीनं फ्रांसमध्ये शेवटचा श्वास घेतला.
मेरी आणि पेरी क्युरीची कन्या आयरीन ह्यांनी पण आईच्या पावलावर पाऊल टाकून पती फ्रेडरिक जॉलियट यांच्या साथीने १९३५ मध्ये रसायन शास्त्राचे नोबेल मिळवले. अर्थात इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव करायचा उद्देश असल्याने आयरीन यांचा उल्लेख देखील अनिवार्यच ठरतो.
सर्व संदर्भ आणि फोटो - https://www.nobelprize.org
इतिहासाच्या पाऊलखुणा या फेसबुक समूहावर नवरात्री निमित्त्य चालू असलेल्या इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख करून देणाऱ्या मालिकेसाठी लिहिलेला लेख.

