समुद्र विज्ञान - खोल, दुर्लक्षित आणि प्रचंड
माझ्या अभ्यासात सर्वात शेवटी आलेला पण माझा अत्यंत आवडता. विषय खूप मोठा, अगदी समुद्रासारखाच. मला एकदा एक NIO(National Institute of Oceanography, Goa) मध्ये काम करणारे वैज्ञानिक म्हणले, "आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल जास्त माहीत आहे पण समुद्राबद्दल कमी माहीत आहे." जमिनीला फक्त पृष्ठभाग आहे पण समुद्राला खोलीपण आहे आणि यामुळे समुद्राचा आवाका प्रचंड वाढतो. अंदाजे पासष्ठ लाख (६५०००००) प्रजाती जमिनीवरच्या माहित आहेत तर समुद्रातल्या फक्त तेवीस लाख (२३०००००). साधारण अंदाज यावा कि किती आपण आपल्या पृथ्वीवरच्या ७१% भागाबद्दल किती अज्ञानी आहोत.
आपल्या पुराणकथांनी समुद्राला रत्नाकर असं फार सुंदर नाव दिलंय का ते आता कळतंय, एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीपेक्षा २००० मीटर अधिक खोल अशी मरियाना गर्त, तळाशी उसळणारे ज्वालामुखी, गरम वायूंचे झरे, तेल विहीरी अश्या काय काय गोष्टी हा समुद्र पोटात घेऊन बसलाय कुणास ठाऊक! सजीव सृष्टी तर यापेक्षाही अधिक विस्मयजनक आहे, एका मीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातल्या दोन भागांइतक्या सूक्ष्म प्लवकांपासून, जेली फिश, आपल्या रोजच्या खाण्यातले सुरमई, पापलेट, बांगडे असोत, सुंदर आणि दीर्घायुषी कासवं, रंगबेरंगी प्रवाळ आणि स्पंज, ते अगदी हत्तीपेक्षाही मोठा म्हणजे एक लाख नव्वद हजार किलो वजन असणाऱ्या आणि २५ मीटर लांबीच्या देवमाश्यापर्यंत सगळे जण राहतात इथे.
या सजीवांच्या जगण्याच्या तऱ्हा तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या की उत्तर ध्रुवाच्या उणे ४० (-40'C ) अंशाच्या थंडीपासून ३५० अंशाच्या उष्णतेपर्यंत (350°C), सामू (pH) मध्ये पडणारा फरक, पाण्याचा दबाव, तळाशी असणारी सूर्यप्रकाशाची कमतरता, शिवाय तुमच्या आमच्या कृपेनं होणारं प्रदुषण, तेल गळती या सगळ्यावर मात करून आयुष्य फुलतच जात आहे.
स्कूबा डायव्हिंग करता आल्यानं यातला किमान अंश तरी जवळून पाहता आला.
अजून खूप शोधायचं बाकी आहे, चंद्र, अवकाश, मंगळावर संशोधन करणारे आपण या सुंदर सृष्टीचा शोध कधी पुर्ण करणार?

![]() |
| स्कूबा डायव्हिंग करणारा मी |
![]() |
| माणूस, ब्लू व्हेल आणि हत्तीच्या आकाराची तुलना |
![]() |
| प्रवाळ आणि कासव |