Thursday, 10 March 2016

हम सायन्स की तरफ से हे

मी हा ब्लॉग का सुरु करतोय? कालच मनात विचार आला की इंटरनेट वर शेकडो ब्लॉग आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे पण विज्ञान विषयावर किती आहेत? मग शोधल्यावर समजलं कि आहेत खूप सारे, मग बघितल मराठीत किती? त्यावर लक्षात आला की फारच कमी. जे आहेत त्यातले बहुतेक भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र असल्या विषयांवरचे (विज्ञानप्रेमी असलो तरीहि हे विषय माझे नाहीत).
विचार केला आता आपणच लिहु, प्राणीशास्त्र (zoology), वनस्पतीशास्त्र (botany), समुद्र विज्ञान (marine science), जैवतंत्रज्ञान (biotechnology), सूक्ष्मजीवशास्त्र (microbiology, यावर माझं प्रेम जर जास्तच आहे).…  
माझा महत्वाचा हेतू हा आहे की, जगाला व्यापुन राहिलेल, यत्र, तत्र, सर्वत्र भरून राहिलेल, अतिप्रचंड विज्ञान माझ्या समजुतीनुसार सर्वांना समजून सांगावं.
विज्ञानाची ओळखही नसलेली व्यक्तीही समजू शकेल इतकं सोपं करून सांगायचा माझा प्रयत्न राहील.  

आजपर्यंत अंधारात असलेली समुद्रातील जीवसृष्टी, जीवाणु आणि कवकांची अदभुत कलाकारी आणि बरंच काही आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करेन.
अगत्य असू द्यावे. 

No comments:

Post a Comment